Sunday, August 28, 2011

मैफिल !

लपविली होती जरी का प्रणयार्तता मी आमुची
आले तिच्या नजरेस कोठे, नजर होती आमुची
शालीनता सांभाळूनही सन्मानिले आम्हा तिने
निखळत्या पदरास नाही स्पर्शहि केला तिने !शायरी नुसतीच नाही गावया आलो इथे
कोण्यातरी जिंदादिलाच्या दर्शना आलो इथे
प्राण साऱ्या मैफिलीचे यांनाच आम्ही मानतो
नुसतेच ना या मैफिलीचे आमुचे स्वतःचे मानतोदोस्तहो मैफिल आपुली, रंगण्या जर का हवी
आम्हा नको सौजन्य, तुमची जिंदादिली नुसती हवी
ऐसे जरी नक्कीच, घेवू तुमच्या मुखाने 'वाहवा'
ती हि अशी, ज्या 'वाहवा' ला द्यावी आम्हीही 'वाहवा' !
चीअर्स! - प्रदीप