माझे जिवन गाणे...
शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०२५
कुणी म्हातारी शुभ्र रूपेरी
शुक्रवार, ११ जुलै, २०२५
श्रद्धा आणि विश्वास!!!
एका डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या आणि आकाशाला भिडलेल्या कड्यांखाली वसलेल्या एका टुमदार शहरात लोक मोठ्या संख्येने एकत्र जमले होते.
दोन उंच इमारतींमध्ये एक दोरी ताणली गेली होती.
पातळ इतकी जसा एक धागा, पण मजबूत.. जशी एखादी दिलेली शपथ...
एक माणूस त्या दोरीवर चालायला लागला.
त्याच्या हातात होती एक लांब समतोल काठी....
पण ज्यामुळे सगळ्यांचे श्वास रोखले गेले होते …
ते म्हणजे त्याच्या खांद्यावर बसलेलं एक लहान मूल
— शांत, स्थिर, पूर्णपणे शरण गेलेलं.
वाऱ्याच्या झुळका,
खाली धडधडणारी मनं. ना थरथर, ना घाई.
फक्त श्रद्धेचा आणि कौशल्याचा संथ नाद.
एक एक पाऊल तो चालत गेला
शेवटी एकदाचा दुसऱ्या टोकाला पोहोचला.
आणि मग... !!
टाळ्यांचा कडकडाट, जल्लोष, कॅमेऱ्यांचे फ्लॅश,
हात पुढे येत अभिनंदन करत होते.
मग तो हसून म्हणाला,
“आता मी परत चालून त्या टोकापर्यंत जाऊ शकतो,
असं तुम्हाला वाटतं का?”
“होय!” — असा जोरात प्रतिसाद आला.
तो मान हलवून म्हणाला, “माझ्यावर विश्वास आहे ना?”
“पूर्णपणे!” सगळे ओरडले.
“आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो!”
तो थोडा थांबला, आणि मग शांतपणे विचारलं,
“मग परतीच्या वाटेवर मला, तुमचं मूल माझ्या खांद्यावर द्याल का?”
क्षणात सगळीकडे भयाण शांतता.... नजरा इकडेतिकडे वळल्या.
पाय वळू लागले.
ज्यांनी विश्वासाने घोषणा केल्या,
त्याच आवाजांनी आता मौन पत्करलं.
त्या माणसानं हळूच पाहिलं आणि म्हणाला:
“श्रद्धा ही मनात असते आणि विश्वास हा आत्म्यापासून येतो.
श्रद्धा दूरून पाहते. पण विश्वास ?… तो स्वतःला पूर्णपणे झोकून देतो.”
आता मनापासून खर सांगा,
आपला आपल्या आराध्य दैवतावर,
गुरुवर श्रद्धा आहे की निर्विवाद संपूर्ण विश्वास?
संकलन: प्रदीप देशमुख, पुणे
९९२३२०५६१४
गुरुवार, ८ जून, २०२३
शितल तुझ्या वाढदिवशी.... तुझ्यासाठी आणि तुझ्यातला माझ्यासाठी..
शनिवार, ३ जून, २०२३
आठवणीतल्या पाऊलखुणा...
आपण चालतच असतो... अविरत...
पाऊलखुणा मागे टाकत..
पाऊलखुणा उमटाव्या म्हणून आपण चालत नसतो
त्या आपसूकच येतात आपल्या मागोमाग
...बराचश्या पुसून जातात
पण काही उरतात... कायमच्या....
ठळक दिसतात मागे वळून पाहिलं तर
ज्या खोलवर रुतलेल्या,
पण त्यांनाही नको विसरूस
ज्या वळणांवर पुसल्या गेल्या..
तुझी पावलं पडतील यशाच्या शिखराकडे
आणि पाहशील तू मागे वळून,
माहितेय मला...
आठवशील ह्या पाऊलखुणा
तू पुन्हा विसरून ...
- प्रदीप
शनिवार, २० मे, २०२३
अन् "पुन्हा" निश्चिंत तो झोपला...
शुक्रवार, १९ मे, २०२३
तिची माझी (वेगळीच) लव्ह स्टोरी... ! 💕🥰
बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२
दिखावा
गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१
मातृ टिफिन सर्विस जाहिरात !
शुक्रवार, १६ डिसेंबर, २०१६
विराट ध्येय…अविचल श्रद्धेच्या ‘प्रकाशवाटा’
विराट ध्येय…अविचल श्रद्धेच्या ‘प्रकाशवाटा’ - काही उदात्त, उत्कृष्ठ वाचायाच असेल तर खरच वाचा !
वटवृक्षाच्या छायेत दुसरा वृक्ष रूजत नाही, असं म्हटलं जातं. बाबा आमटे नावाच्या वटवृक्षाखाली प्रकाशवृक्ष रूजला. फुलला आणि बहरला. प्रगत जगापासून दूर राहिलेल्या आदिवासांना हा प्रकाशवृक्ष मिळाला आणि हेमलकसा हे नाव जगासमोर आले. “प्रकाशवाटा’ मधून डॉ. प्रकाश आमटे यांची ही जीवनवाट उमलत जाते आणि आपण फक्त थक्क होत नाही, तर भारावून जातो. “बिकट वाट वहिवाट नसावी…’, हा मंत्र जपत सरधोपट जीवन जगणाऱ्या तुमचे-आमचे डोळे प्रकाशकार्याने दिपून जातात.
समकालीन प्रकाशनने डॉ. प्रकाश आमटे यांनी ही जीवनकथा प्रसिद्ध केली आहे आणि अत्यंत कमी बोलणारे, प्रसिद्धीपासून चार नव्हे, चाळिस हात दूर राहणारे डॉ. प्रकाश आमटे पुस्तकाच्यानिमित्ताने पहिल्यांदाच इतक्या मोकळेपणाने समोर येत आहेत. सत्तरनंतरच्या काळात डॉक्टर झालेल्या तरूणाने नोकरी-धंद्याची वाट न निवडता आदिवासींना प्रकाश दाखविण्याचे कार्य हाती घेणे, ही असामान्य घटना. एका डॉक्टर तरूणीने डोळे उघडे ठेवून या कार्यात आयुष्यभर साथ द्यावी, ही अलौकिक भूमिका. डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांचे जीवन म्हणजे अशा असामान्य, अलौकिक घटनांचा प्रवास आहे. हे असामान्यत्व त्यांना नेहमीच “साधारण’ वाटत आले. म्हणूनच कोणताही गाजावाजा न करता तब्बल पंचविस वर्षांहून अधिक काळ डॉ. प्रकाश यांच्या सेवेत हेलमकसा न्हावून निघाले. आदिवासींना अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाचा उजेड डॉ. प्रकाश यांनी दाखविला.“प्रकाशवाटा’ मध्ये डॉ. आमटे सहज शैलीत जीवनातल्या अत्यंत अडचणीच्या प्रसंगांचे वर्णन करतात. साथ देणाऱ्यांविषयी कृतज्ञता त्यांच्या शब्दांमध्ये ठायीठायी दिसते. कटू अनुभवांना ते असाधारण मिश्किल शैलीत बाजूला लोटतात. माणसांवर त्यांची श्रद्धा आहे आणि ती टिकविण्यासाठी माणसांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे, हे त्यांच्या निवेदनातून पुढे येते. प्राण्यांविषयी त्यांना प्रेम आहे. हे प्रेम त्या प्राण्यांनाही भिडावे इतके तीव्र आहे. हेमलकसामधील “आमटेज् आर्क’ म्हणजे या तीव्र प्रेमाचा साक्षात्कार आहे. तो ज्यांना जाणवला, त्यांनी तो स्विकारला. या साक्षात्काराचा प्रवासही “प्रकाशवाटा’मधील अनोखे पर्व आहे.
निराशा वाटावी, असे प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. ध्येय निश्चित असेल आणि त्यावर श्रद्धा असेल, तर निराशेची तात्कालिक परिस्थिती बाजुला हटविणे सोपे असते. “प्रकाशवाटा’ हे अशा ध्येय निश्चितीचा आणि अविचल श्रद्धेच्या यशाचा प्रवास आहे.
मी वाचलय.. भारावून गेलोय, तुम्ही वाचा अन मला रिप्लाय करा
-प्रदीप ९९२३२०५६१४
चीअर्स! - प्रदीप
शनिवार, १७ मार्च, २०१२
अश्या रीतीने आम्ही (मी) सुखरूप पणे ( न घाबरता) घरी पोचलो !!
माझी शाळा !
पांढरी स्वच्छ लुंगी गुंडाळून उघड्या अंगाने फिरणाऱ्या दहीगावकरांच्या भल्यामोठ्या वाड्यात भाड्याने दिलेल्या अनेक खोल्यांपैकी सहा खोल्यांमध्ये शाळेचा विस्तार.
येह देश है वीर जवानोकां......, इस देशकी धरती सोना उगले ... अश्या स्पुर्तीदायक गाण्यांनी आमचे चिमुकले दंड स्पुरण पावायचे. छाती पुढे काढून ऐटीत गाण्याच्या तालावर चालायचो.
राष्ट्रगीतानंतर वर्गात सगळ्या कवितांची घोकंपट्टी, मंदिरात तल्लीन होवून सुरु असलेल्या मंत्रोच्चारा सारखे वाटत असे.
एका तालासुरात .."नवी लकाकी .. झाडांवरती .. सुखात पाने फुले नाहती" ... ह्या कवितेतील चालीमुळे अवतरलेली नविल "काकी" झाडावरती सुखात कशी बसत असेल हे कोडे सातव्या वर्गात जाई पर्यंत मला उमगले नव्हते. कुणाच्याही काकीला कधी झाडावर चढून बसलेली मी ऐकली / बघितली नव्हती.
फळा कुणी धरायचा, डस्टर , खुर्ची कुणाच्या ताब्यात असेल सरांचा रूळ हातात घेवून रुबाबात कोण मिरवेल, अश्या असंख्य अतिमहत्वाच्या मुद्द्यांवर वानरसेनेचे अनेक गट तयार होत.
अतिशय मानाची समजली जाणारी ही पदे भूषवण्यासाठी प्रसंगी जीवावर उदार होवून शत्रुपक्ष्यावर तुटून पडत असू.
ह्या सर्व गोंधळात अन उत्साहाच्या वातावरणात नेहमीप्रमाणे सरांच्या हातचा मार खाणारे सराईत नेते, मला इंग्रज सरकारच्या लाठ्या झेलून झेंडा खाली न पडू देणाऱ्या स्वातंत्र सैनिकांसारखे भासत. मार खावून पाठीचे धिरडे झाले तरी बेहत्तर, पण हातातले डस्टर सोडणार नाही असे निश्चयाचे महामेरू असणारे अनेक वीर आमच्या वानरसेनेत होते.
यात देवीच्या मंदिराजवळ झोपडपट्टीत राहणारा किस्ना मोरे, "मेकुडे उदंड जाहली" म्हणून लपून छपून हळूच ते खाणारी शेंबडी गंगू, अभ्यासात अतिशय हुशार आणि त्यामुळे घरचे माझी तुलना सतत ज्याच्याशी करत असत तो आशिष जैन, ऋषी कपूर ची style मारणारा महावीर माहुरकर, मोत्यांहून सुंदर अक्षर असणारा पण शुद्ध लेखनात कच्चा असणारा नंदू, चिंचोका घश्यात अडकल्यामुळे ऑपरेशननंतर अन्ननलिकेत शिट्टी बसवलेला मंग्या, सरांच्या उंचीचा, आडदांड, दादागिरी करणारा बाबा आढाव, सुगरीणींची घरटी तोडून आणणारा काळाकुट्ट फुलसुंदर, अतिशय नीटनेटकी व्यवस्थित असणारी, माझ्याशी लेखनांवरून भांडणारी वैशाली उबरहंडे, फुलासारखी नाजूक असणारी, शाळेजवळ राहणारी अंजू पंचवटकर, हरीणासारखा चपळ, दिवाळीतले कणकेचे दिवे खाणारा सचिन पाटील, महावीर नगरात राहणारा, हातात कडे घालून स्वतःला शक्तिमान समजणारा चंद्रकांत खोत, अतिशय शांत, भित्रट, तरी प्रधान आडनाव असणारा प्रशांत, सफरचंदाचे गाल असणारी "टमी" (खरं नाव राजकुमारी ) , सरांच्या हातचे फटके नेहमी खाणारा, राजेश झोड, शाळेत सराव्यतीरिक्त इस्त्रीचे कपडे घालून फिरणारा एकमेव अरुण निकम, माझ्या घराजवळ राहणारी बंजारा सिंधू, मनाविरुद्ध वागलं तर स्वतःचं डोकं भिंतीवर आपटणारी उज्वला, निळ्या डोळ्यांचा गोरापान प्रसन्न उमरकर, बालकवींची "हिरवे हिरवे गार गालिचे ..." कविता पाठ असणारा सुहास .. एक ना अनेक ....
मळ्यातून खडू आणण्यासाठी शाळेत पाठवलं तर, संजीवनी बुटी आणण्यासाठी गेलेल्या पवनपुत्र हनुमानाला मागे टाकणाऱ्या गतीने धावणारी, पाच पैकी एक खडू हळूच खिशात टाकणारी आम्ही मुले ! ;)
कधी चुकून घरी राहिल्यास चार हट्ट्याकट्ट्या मुलांना सर उचल बांगडी करून आणावयास सांगत.
झालेली शिक्षा घरी सांगण्याचा प्रश्नच नव्हता ! घरी कळले तर अजून मार बसण्याची खात्री होती. कुणाच्याही पालकांनी तक्रार केलेली आठवत नाही ...... तक्रार केलीच तर "घरीसुद्धा हा कुणाचं ऐकत नाही, थोडं आणखी बडवून काढा " अश्या स्वरुपाची असायची !
पहाडे, पदमने आणि खक्के (काही मुलं त्यांना खप्के असं म्हणायची. त्याचं कारण नंतर कळले की ते नावाप्रमाणे खपाखप खप्के देत) ही आमची शिक्षक मंडळी !
दत्तगुरूंच पहिलं दर्शन कधी झालं ते आठवत नाही, पण ही त्रिमूर्ती अजूनही सदैव आठवणीत आहे.
कित्येक पिढ्या त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या भरवश्यावर ह्या दुनियेत सफल अन सुकर आयुष्य जगताहेत.
त्यांचा अतिप्रचंड उत्साह आणि शिकवण्याची तळमळ आजकालच्या प्रत्येक शिक्षकाला मिळावी.
जीवनभर त्यांनी केलेल्या संस्कारांची शिदोरी अशीच माझ्या सोबत राहावी आणि त्यांचे आशीर्वाद सतत पाठीशी राहावेत अशी मनापासून इच्छा !
गुरुवार, २२ सप्टेंबर, २०११
धुंद सिंहगड
...खूप विशेष नाही ...माझ्या साठी खास होता
जपून ठेवावा कालचा दिवस .... असा एक झक्कास होता.
मी आणि माझे मित्र सिंहगडला गेलो होतो ..
ते धुंद वातावरण शब्दात मांडताना मी कमी पडतो आहे
.....But I know ....u can imagine
मी सांगेल तुम्हाला ...स्वतःच तो अनुभव घेवून बघा..
पडत्या पावसात सिंहगड चढणे ...सगळीकडे कसे ओलेचिंब ..
निसर्गाची 'नशा' चढलेली........ आणि आम्ही धुंद ..
दमछाक होत-होती पण ...मजा कुछ ऐसा था .. कि पूछो मत ....( मै वैसेही बता दुंगा !! ;- )
रिमझिम पाऊस...... गरम भजे.......करवंदे...अन ...कच्ची कैरी
च्यायला height म्हणजे ......आजूबाजूला भिजलेल्या बिनधास्त पोरी ....( मर गये ! )
भिजलेल्या वाटा ......आणि आतुरलेले ढग जमिनीवर उतरलेले
बघितलं तर ..सगळ्या चिंता ..सारी दुखे: ....धुक्या सोबत विरलेले
चढताना तो घाट ...आम्ही मधेच दमलेलो...
चिखलात भरलेल्या जीन्स ...सावरत खडकावर बसलेलो
मधूनच आलेली गार वाऱ्याची झुळूक .....शहारलेलो आम्ही
मडक्यातले दही खाताना ... सारी भूक शमलेली
सब शरम छोडके .......साला अपुन भी ...बच्चेके माफिक
...वोह किचडमें खडा रहा
..पचाक करके jump मारा ... ...सोचा पब्लिक गया भाड में ..
शायद कोई गाली दिया
........ दिल में एकदम ठंडक पडा ..jump के बाद में
...माहित होतं मला मी करतोय ते चूक आहे
..तुम्हाला सांगतो पण ... तेच खरा सुख आहे
यही है जिंदगी दोस्तो......
मरने के पहिले जीना सिखलो.....
एक बार..सिंहगड जाके देखलो
-------------------------------------------------------
भगवान से दुवा करो दोस्तो .....दिल ..से ...
बस एक जिंदगी हमे और देना .....
भले उसमे लम्हे सिर्फ चार हो ....
दोस्त लेकीन हजार देना ...
-------------------------------------------------------
Ya it's..
PraDeep
बुधवार, ११ ऑगस्ट, २०१०
ऋतूचा पहिला वाढदिवस !
काय सांगताय? आश्चर्य आहे....
आत्ता तर ऋतू आईच्या उबदार कुशीत पहुडलेला बघितला होता...
ज्याच्या इवल्या सोनपावलांनी आमच्या घरात
चैतन्याची चौफेर उधळण केलीये ..
ज्याच्या चिमण्या आरोळ्यांनी घर दणाणून गेलंय,
आई बाबांना परत एकदा लहान मुल बनवलंय,
बघता बघता एक वर्ष सरलं सुद्धा !
लाडोबाचे लाड करताना आजोबा आज्जी दमून जातात,
आत्या मावश्या कौतुकाचा वर्षाव करताना थकतात,
काका काकू सगळे श्रम विसरून जातात
ताई- दादा आपली ताईगिरी दादागिरी मिरवायला सज्ज होतात...
जमुयात सगळे पुन्हा, येत्या बुधवारी
अन मज्जा करूया एकदम भारी
२५- ऑगस्टला याल ना घरी
स्थळ तेच, आपली "शिवनगरी" ...
नात आपल जुनंच जरी
वाटायला हव ना सदैव नव ?
निमित्त्य कुठलही असुद्या हो ..
Celebration तर हवंच हव ...
त्या सुवर्णक्षणांना उजाळा देण्यासाठी,
आशीर्वादांच्या सरीमध्ये चिंब भिजण्यासाठी,
ऋतुराजचा पहिला वाढदिवस !
२५ ऑगस्ट, २०१०, संध्याकाळी ६:३० ला,
ब-१८, शिव नगरी, महात्मा सोसायटी,
कोथरूड.
भ्रमण ध्वनी : ९९२३२०५६१३/४
रविवार, २१ फेब्रुवारी, २०१०
माझं मन
उसनं अवसान आणून हसणं शिकलोय मी कधीच,
प्रत्येकवेळी समोरच्याला हसवतांना,
मी फसवत असतो स्वताला
मुरड घालण्याची सवयच झालीय
आता माझ्या मनाला..
- प्रदीप
फुलं सुकतील कदाचित...
पण त्यामागच्या भावना सुकणार नाहीत कधीच,
ह्यांचा सुगंध नसेल दरवळत आता,
पण धुंद करून गेलाय कधीतरी तो।
रंग फिके पडले असतील कदाचित,
पण अंतरंग बघ ते विटणार नाहीत कधीच,
कारण प्रत्येक फुलाला माहित असतं,
एक दिवस येणार,
क्षणिक सुखाचा सुगंध सांडून
आपण अन सुकणार.
तरीही प्रत्येक फुल,
नव्या उमेदीनं फुलतं
सुगंध उधळत चहू दिशांना ,
मंद हवेवर झुलतं...
- प्रदीप
माझ्या चारोळ्या!
पुरावा नकोय मला,
माझा माझ्यावरचाच विश्वास,
उडत चाललाय हल्ली !
- प्रदीप
माझी कविता
त्यासाठी दुखः थोडं हलक व्हावं लागतं,
रातराणी सारखं ते उमलून यावं लागतं,
त्या मुग्ध सुगंधात सार सार सुसह्य होतं,
आयुष्याच्या पहाटे जुळलेल्या
ह्या दोन ओळी मी जीवापाड जपेल,
मला कुठे ठावूक होतं तुझं असणं,
हीच माझी कविता असेल।
- प्रदीप
शनिवार, २० फेब्रुवारी, २०१०
आयुष्य..
म्हटलं तर क्षणाचं,
आयुष्य म्हणजे तळ आहे
हातावरल्या थेंबांच,
आयुष्य म्हणजे स्वप्नं आहे,
आतुरलेल्या कुणाचं,
आयुष्य म्हणजे गोड गाणं,
स्वच्छंद मनाचं.
आयुष्य म्हणजे जग नाही,
तुझं माझं दोघांचं,
आयुष्य म्हणजे चित्र नाही
फक्त दोन रेघांच
अवखळ उघड्या वाटेवरती
गडगडणाऱ्या मेघांच,
आयुष्य म्हणजे तुफान वारं
बेधुंदीच्या वेडाच
सुख म्हणजे हिरवी वाट,
स्वप्नातल्या सत्त्याची,
दुखः म्हणजे केवळ राख,
मनामधल्या हत्त्यांची.
सुख म्हणजे वेडी आशा,
खळाळणार्या ओढ्याची,
कड्यावरून स्वतःला
झोकणाऱ्या वेड्याची.
सुख असं भोगताना,
जाणीव असु दे दुःखाची,
दुःखाच जर केलास गाणं
गरजच काय सुखाची?
- प्रदीप
शनिवार, ९ जानेवारी, २०१०
राहून गेलेल्या गोष्टी !
- लहानशी विहीर खणून केलेली शेती.
-ज्वारीच्या धांडयाची बैलगाड़ी.
-पावसाळ्यात खुपसनिचा खेळ.
-मातीच्या गोळ्यांचा बोंम्ब हल्ला
-सुरपारम्ब्यांचा खेळ
-दिवाळीचा किल्ला
-गणपति बाप्पाची हातानी केलेली मूर्ति
- धामण दरी मधील बोरे चिंचा चारं जांभूळ कैरया ऊसं गोळा करायला जायचंय
- गुर्हाळात जावून आलं टाकलेला उसाचा रस अन गरमागरम गुळ खायचाय.
-आज्जीबाई तूप लोणी चा खेळ
-लगोरी, लंगडी, सागरगोटे इ.
-घरी न सांगता पोहायला जायचंय.
-स्केटिंग करायचं
-तान्हा पोळा साजरा करायचाय.
-दसऱ्याला रावण दहन करायचंय
- पोटभर गरमागरम कांदेपोहे / उकडीचे मोदक खायचे आहेत
- उन्हात तहानभूक विसरून क्रिकेट खेलायचय.
-पडत्या पावसात निसरड्या चिखलात फुटबाल खेळायचाय.
-उबदार गोधडीत शिरून खिडकीतला मुसळधार पाऊस बघायचाय
-लपंडावाचा राज्य घ्यायचाय ... आठवडाभर :)
-बांबू पासून धनुष्य बाण बनवून "रामायण" स्टाईल लढाई करायचीये
-चोर पोलीस खेळत गावभर फिरायचय.
- प्राथमिक शाळेतल्या सरांना शाळेत जावून भेटायचय... पायाला हात लावून नमस्कार करत सांगायचय.. ह्याच वर्गात बसून मार खाल्लाय तुमच्या हातचा :)
चीअर्स!
- प्रदीप