Friday, July 11, 2025

श्रद्धा आणि विश्वास!!!

एका डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या आणि आकाशाला भिडलेल्या कड्यांखाली वसलेल्या एका टुमदार शहरात लोक मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. 

दोन उंच इमारतींमध्ये एक दोरी ताणली गेली होती. 

पातळ इतकी जसा एक धागा, पण मजबूत..  जशी एखादी दिलेली शपथ... 

एक माणूस त्या दोरीवर चालायला लागला. 

त्याच्या हातात होती एक लांब समतोल काठी....  

पण ज्यामुळे सगळ्यांचे श्वास रोखले गेले होते … 

ते म्हणजे त्याच्या खांद्यावर बसलेलं एक लहान मूल 

— शांत, स्थिर, पूर्णपणे शरण गेलेलं.

वाऱ्याच्या झुळका, 

खाली धडधडणारी मनं. ना थरथर, ना घाई. 

फक्त श्रद्धेचा आणि कौशल्याचा संथ नाद.


एक एक पाऊल तो चालत गेला

शेवटी एकदाचा दुसऱ्या टोकाला पोहोचला. 

आणि मग... !!

 टाळ्यांचा कडकडाट, जल्लोष, कॅमेऱ्यांचे फ्लॅश, 

हात पुढे येत अभिनंदन करत होते.


मग तो हसून म्हणाला, 

“आता मी परत चालून त्या टोकापर्यंत जाऊ शकतो, 

असं तुम्हाला वाटतं का?”


“होय!” — असा जोरात प्रतिसाद आला.

तो मान हलवून म्हणाला, “माझ्यावर विश्वास आहे ना?”

“पूर्णपणे!” सगळे ओरडले. 

“आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो!”


तो थोडा थांबला, आणि मग शांतपणे विचारलं, 

“मग परतीच्या वाटेवर मला, तुमचं मूल माझ्या खांद्यावर द्याल का?”

क्षणात सगळीकडे भयाण शांतता....  नजरा इकडेतिकडे वळल्या. 

पाय वळू लागले. 

ज्यांनी विश्वासाने घोषणा केल्या, 

त्याच आवाजांनी आता मौन पत्करलं.

त्या माणसानं हळूच पाहिलं आणि म्हणाला:

“श्रद्धा ही मनात असते आणि विश्वास हा आत्म्यापासून येतो. 

श्रद्धा दूरून पाहते. पण विश्वास ?… तो स्वतःला पूर्णपणे झोकून देतो.” 


आता मनापासून खर सांगा, 

आपला आपल्या आराध्य दैवतावर, 

गुरुवर श्रद्धा आहे की निर्विवाद संपूर्ण विश्वास? 



संकलन: प्रदीप देशमुख,  पुणे  

९९२३२०५६१४